loader
Breaking News
Breaking News
Foto

अग्निशस्त्रे व घातक हत्यारे विक्रीकरीता तसेच बनावट नोटा घरात लपवून ठेवलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद

ठाणे (प्रतिनिधी) - अवैध अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट ३, कल्याणकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेवर बारकाईने लक्ष ठेवून असताना गुन्हे शाखा, घटक ३ कल्याणचे सहा. पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सुरेंद्र पांडुरंग पाटील, (५५), धंदा कन्स्ट्रक्शन, रा. एकविरा बंगला, श्री धनलक्ष्मी अपार्टमेंट बिल्डींग नंबर ५, मोती मिठाईवाल्याचे मागे, दावडी डोंबिवली पूर्व यास सापळा लावून शिताफिने ताब्यात घेवून त्याचे राहते घरी छापा कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपीच्या राहते घर श्री धनलक्ष्मी अपार्टमेंट मधील बिल्डींग नंबर ५चे पाचवे माळ्याचे टेरेसवरील चप्पल स्टेंडचे पाठीमागील बाजूस लिफ्टचे डकमधून प्रवेश करण्यासाठी असलेल्या जागेतील गुप्त बेडरूम मधील कपाटात एक विशिष्ट कप्पा बनवलेल्या जागेत ठेवलेले ०३ देशी बनावटीचे पिस्टल, ०१ सिक्सर रिव्हॉल्वर, ०७ गावठी कट्टे, ०१ रिकामी मॅगझिन, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, जिंवत १६७ छरे, २ धारदार लोखंडी तलवार, ३ लोखंडी कोयते, ०१ लोखंडी धारदार सूरा, ०१ बटन चाकू, ०२ लोखंडी रॉड तसेच ०२ मोबाईल फोन व तसेच ३ लाख ५२ हजार किमतीच्या भारतीय चलनातील जुन्या व नवीन बनावट नोटा असा एकूण १२ लाख २१ हजार रूपये (बारा लाख एकवीस हजार रूपये) किमंतीची अग्निशस्त्रे, घातक हत्यारे व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

सदर प्रकरणी इसम नामे सुरेंद्र पांडुरंग पाटील, (५५) याचेवर मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात सुरेंद्र पांडुरंग पाटील, (५५) यास अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याणचे सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करीत आहेत. सुरेंद्र पांडुरंग पाटील, (५५) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूवीर्र् विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg