loader
Breaking News
Breaking News
Foto

पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान, पुणे आयोजित अखंड किर्तन महोत्सव व वारकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित अखंड किर्तन महोत्सव व वारकरी प्रशिक्षण प्रतिष्ठानच्या सभासद, साधक व दानशूर भाविकांच्या सहकार्याने दि. २४ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये महालक्ष्मी मंदिर, बारगोडेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ, मु. पो. वेळंब, ता गुहागर येथे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ वा.पारायण, सकाही ८ वा. अल्पोपहार, सकाळी ९ ते १ किर्तन, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ किर्तन, सायं. ६ ते ७ हरीपाठ, सायं. ७ ते ९ किर्तन, रात्री ९ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. सांप्रदायीक भजन दि.२४ एप्रिल रोजी ह.भ.प. रीया भुवड, वडद, ह.भ.प. उज्वलाताई पुणे, ह.भ.प. ऋषी माउली आनंदी, ह.भ.प. मनाली धायगुडे, ह.भ.प. भावेश शिंदे, ह.भ.प. छाया चव्हाण वडद यांचे कीर्तन व अभंग होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि.२५ एप्रिल रोजी ह.भ.प. गिरीश पांडे, ह.भ.प. गौरव मुळे, ह.भ.प. आशा कनवडे, ह.भ.प. ज्योती खांडेकर, ह.भ.प. विजय माळी, ह.भ.प. गायत्री देशमुख यांचे कीर्तन व अभंग होणार आहे. दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. राजश्री पाटकर, ह.भ.प. चंद्रकांत कदम, ह.भ.प. चारुशीला गुल्हाणे, ह.भ.प. वैष्णवी गवळी, ह.भ.प. प्रकाश सोलकर, ह.भ.प. रंगनाथ नाईकडे यांचे कीर्तन व अभंग होणार आहे. या वारकरी प्रशिक्षणामध्ये येणारे विषय: बालसंस्कार, मृदुंग, गायन, पंचनदी, फेटा बांधणे, पारायण इ. शिकवीले जाणार आहे. नाव नोंदणी अनिवार्य, राहणे व भोजन मोफत, प्रवेश निःशुल्क, मृदुग व बालसंस्कार मैगल्या ठिकाणी घेतले जातील. जाणकार शिक्षक वृंद,मृदुग प्रशिक्षणा साठी मृदंग स्वतःचा असावा, गुहागर तालुज्यातील सर्व किर्तनकारांचा सन्मान रात्री ९ वा. करण्यात येणार आहे. संपर्कासाठी ह.भ.प. रीया भुवड, अमोल वनगे, संतोष भुवड, कृष्णा तटकरे मोबाईल.८८८८५६८८७५ येथे संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg