loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रत्नागिरीत रोखले; पळवून नेणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी येथे कारवाई करत संबंधित अल्पवयीन तरुणी आणि तिच्या सोबत असलेल्या तिघा तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयीत साई बसवेश्वर रिंजे (१८) आणि रोन मोहन राठोड (१८) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा अल्पवयीन आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी येथील असून ती शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्यास होती. मुंबईत असताना तिची एका तरुणाशी मैत्री झाली होती, मात्र तिच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नव्हती. त्यामुळे पालकांनी तिला पुन्हा सावंतवाडीत आणले होते. दरम्यान, तिला नेण्यासाठी तिचा तो मित्र आपल्या चार सहकाऱ्यांसह सावंतवाडीत दाखल झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले होते. मात्र, घरी परतल्यानंतर तिने पुन्हा आपल्या मित्रांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ती मुंबईच्या दिशेने रवाना झाली. पालकांनी तातडीने ही माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सावंतवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. ही मुले रेल्वेने जात असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर या सर्वांना रोखण्यात आले. पोलिसांनी या सर्वांना पुन्हा सावंतवाडीत आणले असून, अधिक चौकशीअंती तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg