loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे मुंबईकरांना सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंड

खेड - सध्या खेड तालुका विकासात अग्रेसर आहे अशी सर्वत्र चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु खेड तालुक्यातील रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे मुंबईकरांना प्रमाणापेक्षा जादा दराने रिक्षा भाडे देऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. खेड रेल्वे स्टेशन ते भोस्ते ब्रिजपर्यंत रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावर रिक्षा चालकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. मुंबईतून आलेला चाकरमानी बांधव खेड रेल्वे स्टेशनला उतरल्यावर शेअरींग रिक्षाने याच मार्गाने खेड एसटी स्टँडवर येत असतो. पुर्वी रिक्षावाले प्रती सीट रु 20 प्रवास भाडे घेत होते. परंतु सध्या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे रिक्षावाले प्रती सीट रु 30 प्रवासी भाडे घेत आहेत. खरोखरच रस्ता खराब असल्याने रिक्षा चालक बांधवांना दोष देणे बरोबर वाटत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईकर मते देण्यासाठी गावी आले पाहिजेत अशी सर्वपक्षीय पुढा-यांची अपेक्षा असते परंतु मागील एक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब आहे. त्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आपल्या पुढा-यांकडे वेळ नाही. ‌खेड रेल्वे स्टेशन ते भोस्ते हा साधारण एक ते दीड किमी चा मार्ग आहे. परंतु विकासाच्या गप्पा मारणा-या पुढा-यांना हा रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही ही खेदाची बाब आहे. मुंबईकर बांधव मुंबईतून काटकसर करून खेड पर्यंत रु 100 खर्च करून येतो. परंतु ग्रामीण भागात जाणारे रस्ते खराब असल्याने रिक्षाला प्रमाणापेक्षा जास्त भाडे देऊन आपापल्या गावी जावे लागते. बांधवांनो ही १००% खरी वस्तुस्थिती मी मांडली आहे तरी यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान करताना मुंबईकर चाकरमानी मतदारांनी योग्य विचार करून मतदान करावे, अशी विनंती आहे. अशी मागणी रामचंद्र बाबू आखाडे समाजसेवक यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg