मालवण (प्रतिनिधी) - भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात. त्यातूनच आनंद मिळवला जातो, असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ सोमनाथ कदम यांनी येथे बोलताना केले. आचरे येथील ऐश्वर्य रिसॉर्ट येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीच्या वार्षिक मेळावा अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी डॉ सोमनाथ कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत सुरेश गावकर, जे एम फर्नांडिस, बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर, मनाली फाटक, प्रकाश पेडणेकर, ऐश्वर्य रिसॉर्ट च्या मिताली कोरगावकर, आदीसह बहुसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी वायंगणी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व ज्ञानदीप वाचनालय वायंगणी चे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी बाबाजी भिसळे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यवाह जे. एम. फर्नांडिस यांनी अहवाल वाचन केले. कार्य वृत्तांत सुरेश ठाकूर यांनी सादर केला. यावेळी बोलताना डॉ. कदम यांनी ज्येष्ठांनी सुखी व आनंदी जीवनातील तरुणांच्या संसारात ढवळाढवळ करू नये गरज पडली व विचारले तरच त्यांना मार्गदर्शन करायचे, पूर्वीपेक्षा आता कुटुंबात बदल होताना दिसतात, असे मत व्यक्त केले.
यावेळी पाच ज्येष्ठ नागरिकांनी संघाचे सभासदत्व स्वीकारले त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ऐश्वर्य रिसॉर्ट च्या मिताली कोरगावकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दुस-या सत्रात आमच्या वेळच्या कविता हा जेष्ठ भगिनींनी सादर केलेला कविता गायनाचा कार्यक्रम झाला. तर संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेवटी महिला आघाडी प्रमुख मनाली फाटक यांनी आभार मानले. या मेळाव्याला संघाचे 98 सभासद उपस्थित होते.































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.