बांदा (प्रतिनिधी) - बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत पोलिसांनी ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध ब्रँड्सच्या दारूच्या १,२५२ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून राजापूर येथील प्रशांत रवींद्र जाधव (वय ३३) याला ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा तपासणी नाका येथे वाहनांची तपासणी सुरू असताना गोव्याहून येणारी सिल्व्हर रंगाची टोयोटा इनोव्हा (एमएच ४३ एन २३३९) संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली. तपासणीदरम्यान गाडीत मॅकडॉवेल नंबर १, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, रॉयल ग्रीन व रिझर्व्ह ७ या ब्रँड्सच्या ७५० मिली व १८० मिलीच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.
जप्त दारूची किंमत ४ लाख ८ हजार रुपये असून ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी असा एकूण ११ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा व विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, एएसआय दासू पवार यांच्यासह प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, नेल्सन फर्नांडिस व प्रशांत बोठे यांच्या पथकाने केली.














































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.