loader
Breaking News
Breaking News
Foto

मसुरे येथे सिंधू आरोग्य मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

मालवण (प्रतिनिधी) - आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खर्‍या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झाल्यास शासनाचा आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याचा उद्देश खर्‍या अर्थाने सफल होईल. ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी सुद्धा अशा मेळाव्यांचा लाभ घेऊन आपली आरोग्य विषयक समस्या दूर करावी, असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीच्या नूतन सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे यांच्यावतीने सिंधू आरोग्य मेळावा मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकताच संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन मालवण सभापती सौ.प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी मसुरे जि.प. सदस्य क्षमा हडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समिती सदस्या श्रीमती योजना कांबळी, संजय ठाकूर, आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील, डॉ. सायली मिठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी या आरोग्य मेळाव्या विषयी माहिती देऊन शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचीही माहिती उपस्थित रुग्णांना देऊन शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

टाइम्स स्पेशल

यावेळी सर्व रुग्णांची तपासणी डॉक्टर वसीम वल्लिकापट्टा, डॉक्टर ब्लेसी जोसेफ, डॉक्टर पूजा, डॉक्टर भावनेश चव्हाण, डॉक्टर अखिल बेगडे, डॉक्टर श्रीमती आर्या कदम, डॉक्टर कृष्णा त्यागी, डॉक्टर विना मेहंदळे, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली मिठारी, डॉक्टर प्रियांका पाटील यांनी केली. यामध्ये हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्यचिकित्सक, नेत्ररोग, ईसीजी, वाय वंदना, पीएमजेएवाय कार्ड, एचएलएल टेस्ट, व्हीआयए टेस्ट, एचपीव्ही लसीकरण, एनसीडी विभाग, जनरल फिजिशियन आधी विभागातील आरोग्यविषयक समस्या बाबत रुग्णांनी सहभाग नोंदवला. उपस्थित रुग्णांची तपासणी करून प्राथमिक स्वरूपातील औषधोपचारही पूर्णपणे मोफत करण्यात आले. यावेळी मसुरे ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या आरोग्य मेळाव्यात २०५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg