केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातून गेलेल्या उड्डाण पूलाखालून लांजा साटवली फाटा आणि कोर्ले फाटा या दोन ठिकाणी अंडरपास ब्रीज वगळता अन्यत्र अंडरपास ब्रीज कोठेही ठेवण्यात आला नाही. लांजा हायस्कूलसमोर अंडरपास ब्रीजची मागणी करूनही संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने जनतेतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. आबाल-वृध्दांसह सर्वांना इकडून रस्ता ओलांडून जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत लांजा शहरातील उड्डाण पूलाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. मात्र पुलाखाली सुरक्षित अंडरपास नसल्यामुळे नागरीक, शालेय विद्यार्थी, कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांच्यासह जनतेला ये-जा करताना अडचणी निर्माण होणार आहेत.
हीच बाब लक्षात घेता लांजा समन्वय समितीच्या वतीने अंडरपास ब्रीजची मागणी केली आहे. मात्र अद्याप याबाबत मंजुरी मिळालेली नाही. लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम जोरदार सुरू आहे. पुलाला जोडण्यात येणा-या रस्तावर भिंत घालण्याचे कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे लांजा हायस्कूल, पोलीस स्थानक, पंचायत समिती कार्यालयासमोर महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध भिंत उभी रहाणार असल्यामुळे नागरिक, विद्यार्थीसह सर्वानाच इकडून तिकडे ये-जा करण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान उपअभियंता कुलकर्णी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अद्याप अंडरपास ब्रीजच्या मागणीला मंजुरी मिळालेली नाही. दोन ठिकाणी ये-जा चे मार्ग असल्याचे सांगितले. अंडरपास ब्रीज नसल्यामुळे रस्ता ओलांडून जाताना मोठा वळसा घेऊन जाणे भाग पडणार आहे. लांजा शहरातील पूलाची लांबी मोठी असल्यामुळे अंडरपास ठेवणे आवश्यक होते. पण संबधित यंत्रणेकडून अंडरपास ठेवण्यात आले नसल्यामुळे लांजातील जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.





























































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.