रत्नागिरी (जमीर खलफे) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी स्पोर्ट्समार्फत उद्या, रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी ’ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ही परीक्षा अखिल भारतीय (ऑल इंडिया) स्तरावर आयोजित करण्यात आली असून, यासाठी संपूर्ण भारतातून तायक्वांदो खेळाडू रत्नागिरीत दाखल झाले आहेत. खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची कसून चाचणी या परीक्षेत घेतली जाणार आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी रत्नागिरीतील नामांकित एसआरके तायक्वांदो क्लब (मारुती मंदिर) चे एकूण १४ खेळाडू पात्र ठरले आहेत. प्रथम दान साठी पात्र: रोमा तापेकर, रोहित कुडकर, चैतन्य देशमुख, प्राजक्ता काटकर, ओम देसाई, रुद्र पावसकर, आयुष कोळेकर, आयुष चव्हाण आणि श्रीयांश हत्तीसकर, द्वितीय दान साठी पात्र: श्रेयसी हत्तीस्कर, अर्जुन पवार, प्रांजल लांजेकर, निर्मित सावंत आणि पार्थ गुरव. हे सर्व खेळाडू उद्या ब्लॅक बेल्ट या मानाच्या पदवीसाठी आपली परीक्षा देतील.
या खेळाडूंच्या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा आणि सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण करा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक गडशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत आणि सदस्य प्रफुल्ल हातिसकर व निखिल सावंत यांनी खेळाडूंच्या तयारीवर समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.















































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)

































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.