दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर तिलारी घाटाच्या माथ्यावर कोदाळी जवळ अचानकपणे जंगलातील किंग कोब्रा रस्त्यावर आला. याची माहिती पाटणे वनविभाग कर्मचारी यांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी मोठया प्रमाणात जंगल आहे. कोदाळी खाली तिलारी धरणाच्या जलाशयात केंद्रे गावातील लोकांची ये-जा करायची पूर्वी वाट देखील होती.
गोवा दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर तिलारी घाटाच्या माथ्यावर गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता अचानकपणे रस्त्यावर किंग कोब्रा या सापाचे दर्शन झाले. या परिसरात जगातील अतिविषारी लांब किंग कोब्रा या जातीच्या सर्पाचे आढळस्थान असल्याने हा परिसर जैवविविधतेने अधिकाधिक समृद्ध असल्याचे पुन्हा सिद्ध होत आहे. कोदाळी येथील तरुण संतोष गावडे हा या रस्त्यावरून जात होता. यादरम्यान रस्त्यावरील मोरीवरून हा किंग कोब्रा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात होता. त्या सापाची सुमारे 12 फूट इतकी लांबी होती.
घटनास्थळी पर्यटकांनीही गर्दी केली होती. याबाबत पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील म्हणाल्या, यापूर्वी अनेक वेळेला किंग कोब्रा या वैशिष्ट्यपूर्ण सापाचा आढळ स्पष्ट झाला आहे. जगातील सर्वात लांब अति विषारी साप म्हणून याची गणना होते. बारा ते अठरा फूट इतकी लांबी या सापाची असू शकते. अशा सापांचे दर्शन झाल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन केले.



































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)

































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.