loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सभापती सुचिता वेल्हाळ यांचे निधन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्याच्या माजी सभापती सुचिता सुशील वेल्हाळ यांचे आज बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी शृंगारतळी येथे निधन झाले आहे. त्यांची अंतयात्रा शृंगारतळी येथून त्यांच्या रहात्या घरातून शृंगारतळी स्मशानभूमी पर्यंत ठीक सायंकाळी ७ नंतर निघणार आहे. विद्यमान पंचायत समिती सदस्य गौरव सुशील वेल्हाळ यांच्या त्या मातोश्री आहेत. शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते कै. सुशील अप्पा वेल्हाळ यांच्या पत्नी असलेल्या सुचिता वाहिनी या भारतीय जनता पक्षातर्फे सभापती झाल्या होत्या. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. महिला वर्गात त्या विशेष लोकप्रिय होत्या. सुशील अप्पाच्या सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने शृंगारतळीत शोक व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg