सावंतवाडी (प्रतिनिधी) : शासकीय स्तरावर इंधनाचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. आंबा-काजू बागायतदार, शेतकरी आणि मच्छीमार यांना व्यवसायासाठी तातडीने मुबलक इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना चार-चार दिवस रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक ग्राहकांनी महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही त्यांना अद्याप पुरवठा झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, याचा मोठा फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसत आहे. शेतीमाल शहरापर्यंत नेण्यासाठी गाड्या उपलब्ध नसल्याने पिके शेतातच कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मच्छीमार बांधवही इंधन अभावी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे, सामान्य जनता आणि शेतकरी इंधनासाठी वणवण फिरत असताना, मंत्री आणि शासकीय अधिकारी मात्र गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत आहेत, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. इंधन अभावी रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचेही राऊळ यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी ठाकरे शिवसेनेच्या वतीने मागण्या करण्यात आल्या: मुलांसाठी आणि नागरिकांसाठी लागणारे शासकीय दाखले ग्रामपंचायत स्तरावरच उपलब्ध करून द्यावेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून शासकीय दौऱ्यावेळी एकाच गाडीचा वापर करावा. रुग्णवाहिकांसाठी राखीव इंधन साठा ठेवावा आणि नागरिकांना तात्काळ गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत. याप्रसंगी चंद्रकांत कासार, राजू शेटकर, विनोद ठाकूर, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, सुनील गावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















96.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.