दापोली (प्रतिनिधी) - दापोली बुरोंडी मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर लाडघर हद्दीत दीपस्तंभ सी व्ह्यू होम्सच्या बरोबर समोर एका बाजूला असलेल्या दरीकडील रस्त्याची एक बाजू खचली आहे. रस्त्याच्या खचलेल्या बाजुकडील खोल दरी असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. मार्ग वाहतुकीस धोक्याचा झाला असला तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग वाहने सावकाश चालवा, पुढे रस्त्याची एक बाजू खचली आहे, पुढे धोका आहे अशा प्रकारचा साधा नामफलक सुद्धा लावण्याचे काम करत नाही. त्यामुळे या मार्गावरील धोका कायम आहे.
दापोली बुरोंडी हा मार्ग व्यापार उद्दीमाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा आहेच शिवाय पर्यटन आणि प्रवासी वाहतुकिसह मासळी वाहतुकिसाठी अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. अशा या मार्गावर एका ठिकाणी चंद्रनगर महसुली हद्दीत दीपस्तंभ सी व्ह्यू होम्सच्या बरोबर समोर रस्त्याची खोल दरीकडची बाजू खचली आहे. अपघात होवू नये यासाठी त्या ठिकाणी कोणीतरी सामाजिक भावनेने दगड लावून ठेवले आहेत. मात्र अनेक दिवस झाले तरी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या अजूनही निदर्शनास कशी आली नाही, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
मार्गावरील वाहतूक सुरळीत आणि विना अपघात सुरक्षित सुरू राहण्यासाठी अपघाताची वाट न पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या समस्येची दखल घेऊन रस्ता वाहतूक योग्य करायला हवा.












































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.