मालवण (प्रतिनिधी) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी ८:३० वा. समाजमंदिर मालवण येथे पूजापाठ, सकाळी ९ वा. समाजमंदिर एस.टी. स्टैंड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांगीवाडा मालवण अशी भव्य धम्मरॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे जाहीर सभा होणार असून सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्र सेवादल कोल्हापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. बाबासाहेब नदाफ हे प्रमुख पाहुणे स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष रंजन तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्राचार्य कैलास राबते, नगरसेवक तथा मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका तथा आरोग्य स्वच्छता समिती सभापती पूनम चव्हाण, कणकवली येथील रेडिओलॉजिस्ट डॉ. सतिश पवार, लेखक व नाटककार डॉ. श्रीकांत धारपवार यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सत्कार करण्यात येणार आहेत. तर दुपारी ३ ते लोकशाहीर सदाशिव निकम कोल्हापूर यांचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा पुरोगामी जलसा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंचतर्फे करण्यात आले आहे.































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.