दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दापोली यांनी जारी केलेल्या आदेशानुसार कासवांच्या अंडी घालण्याच्या कालावधीत किनाऱ्यावर विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
दक्षिण कोकण वनविभागाच्या सूचनेनुसार दापोली तालुक्यातील काही किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासव मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर कासवांचे संरक्षण आणि संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात आली आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर लाईटचा वापर टाळणे, सर्व दिवे बंद ठेवणे तसेच कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा ध्वनी प्रदूषण न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच किनाऱ्यावर प्लास्टिक किंवा इतर कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली असून स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कासव दिसल्यास त्यांना स्पर्श करणे, फ्लॅश लाईट मारणे किंवा कोणत्याही प्रकारे त्रास देणे कायद्याने दंडनीय ठरणार आहे. याशिवाय कासव अंडी घालत असलेल्या ठिकाणी वाहनांची वर्दळही बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. कासव संवर्धनासाठी जनजागृती वाढविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





























































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.