loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन चा होमकॉन २०२६ कार्यक्रम उत्साहात

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन दापोली चा होमकॉन २०२६ हा होमिओपॅथी क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक एकात्मता यांचा सुंदर मेळ असलेला कार्यक्रम नूकताच दापोली येथे उत्साहात संपन्न झाला. सकाळच्या सत्रात शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तर संध्याकाळी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली. शैक्षणिक सत्रात विविध मान्यवरांचे मार्गदर्शक व्याख्यान झाले. पहिल्या व्याख्यानात डॉ अजेय जोगळेकर, महाड यांनी acute cases (गंभीर प्रकरणे, तीव्र आजार किंवा तातडीची प्रकरणे )मध्ये होमिओपॅथी औषध कसे prescribe( लिहून द्यावे) करावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मकरंद ठोंबरे यांनी “Role of EQ in Happy and Healthy Living” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत मानसिक संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले. तिसऱ्या सत्रात डॉ. समिक्षा मेहता यांनी वैद्यकीय निदानामध्ये सोनोग्राफीची भूमिका स्पष्ट केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्य कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते, डॉ. नरेश पटवर्धन, डॉ. मंगेश जतकर आणि प्रशांत परांजपे यांचा कार्यक्रमात विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, डॉ. दिलीप जोशी( स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. अनिरुद्ध फडके (बालरोगतज्ज्ञ), डॉ. कुणाल मेहता (शल्यचिकित्सक) रत्नागिरी तालुका अध्यक्ष डॉ. योगेश जोग, खेड तालुका अध्यक्ष डॉ. विनोद स्वामी तसेच दापोली होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. चेतना गोरीवाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी समय सूचक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. माधुरी साठे आणि डॉ. अमृता होन यांनी सुमधुर शारदा स्तवन सादर केले. तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांतील विजेत्या डॉक्टरांना पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रतीवर्षाप्रमाणे CCMP उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याची घोषणा डॉ. तुषार म्हसकर आणि डॉ. फाइक जोगिलकर यांनी केली. प्रतिवर्षी दिला जाणारा जीवन गौरव हा मानाचा पुरस्कार डॉ. प्रशांत तलाठी आणि डॉ. सचिन गुजर यांना देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद सर्व डॉक्टरांनी घेतला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदेश लखमदे, सचिव डॉ. काझिम खोत आणि खजिनदार डॉ. महेंद्र रेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच संपूर्ण DHAM समितीने कार्यक्रम यशस्वी करण्याकरता विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. तनवीर शेख, डॉ. संदेश पडवेकर आणि डॉ. निखिल पावसे यांनी केले. आभार डॉ सुनिल पालकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg