loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा काजूचा विमा भरूनही मागच्या वर्षीचा विमा काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही

देवळे (प्रकाश चाळके) - शेतकऱ्यांचे आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानी पासून वाचवण्यासाठी शासनाने शेती विमा हा पर्याय ठेवला असून त्यासाठी शेतकरयानी कर्ज काढल्यास बँकातून किंवा वित्तीय संस्थातून विमा उतरवतात. मात्र अशा काही विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना आंबा काजूचे नुकसान होऊन ही मागील वर्षीचा विमा अद्यापही मिळालेलाच नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. याला जबाबदार कोण बँक की विमा कंपनी ? असा शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. याबाबत शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण असून बँक आणि विमा कंपनीच्या गलथांन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बँक आणि विमा कंपनी येथे फेऱ्या मारून शेतकऱ्यांची फरपट होत आहे. मात्र दोन्ही ठिकाणी उडवा उडवीची उत्तरे दिली जात असून स्वतःवरची जबाबदारी झिडकारली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवळे येथील एक सुजाण शेतकरी अनिल शिर्के यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी देवळे बँक व विमा कंपनी यांच्याशी योग्य त्या प्रकारचा पत्रव्यवहारही केला असून अनेक वेळा याबाबत बँक अधिकारी व विमा कंपनी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून कुणीही विमा न दिल्या बाबतचा किंवा न मिळाल्याबाबतची योग्य उत्तरे देत नसून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. गेले सहा, सात महिने मी दोन्ही कार्यालयात अनेक वेळा याबाबत विचारणा केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे असेच नुकसान झाले असून आम्हाला विमा कंपनीकडून व बँक यांच्याकडून कोणतीही विमा मिळण्यासाठी योग्य उत्तरे दिली जात नाहीत असे शिर्के म्हणाले. याबाबत न्याय कोणाकडे मागावा ? असा यक्ष प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पडला असून असे जिल्ह्यातील सुमारे 200 ते 250 शेतकरी विम्या पासून वंचित असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg