सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगर परिषदेने मालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या २० मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या २० मालमत्तांकडून सुमारे ३ लाख २३ हजार रुपयांची थकबाकी असून, प्रशासनाने या मालमत्तांना टाळे ठोकले आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या कर विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. शहरातील निवासी, बिगर निवासी, मिश्र आणि औद्योगिक अशा एकूण ११,९५७ नोंदणीकृत मालमत्तांची तपासणी सुरू आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यालयीन अधीक्षक वैभवकुमार अंधारे, कर अधिकारी गोविंद गवंडे, कर निरीक्षक प्राची पाटील, लेखापाल प्रसाद बटवाल, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत आणि नगररचनाकार गौरव बुगड यांच्या पथकाने ही सील करण्याची कारवाई केली. १ मार्चपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ मार्चपर्यंत अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मागणी बिले यापूर्वीच वाटप करण्यात आल्यामुळे आता कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केवळ मालमत्ता करच नव्हे, तर पाणीपट्टी थकविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्यास सुरुवात केली आहे.
कर भरणा सुलभ व्हावा यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही नगरपरिषदेचे 'नागरी सुविधा केंद्र' सुरू ठेवण्यात येणार आहे. जप्ती आणि नळतोडणीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी तात्काळ भरावी, असे आवाहन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.




































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)

































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.