मालवण (प्रतिनिधी) - नादरुखच्या जंगलमय भागातील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत कोळंब खडवणनाका येथील रहिवासी आणि देवगड एसटी आगारातील वाहक लाडोबा मेघश्याम लाड (वय ३५) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी रात्री लटकताना आढळून आल्याने खळबळ माजली आहे दरम्यान लाडोबा लाड याच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही नादरुख च्या जंगलमय भागात तरुणाचा मृतदेह सापडल्याचे समजताच मालवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली याबाबत मालवण पोलिसात गौरव बन्सीधर लाड याने खबर दिली असून पोलीस तपास सुरु आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोळंब खडवणनाका येथील लाडोबा लाड हे नाना लाड या नावाने ओळखले जात. ते अविवाहित होते. सन २००९ मध्ये वाहक म्हणून सेवेत रुजू झालेले नाना लाड हे गेले काही दिवस सुट्टीवर असल्याचे देवगड मधील त्यांच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत होते. शुक्रवारी रात्री नांदरुख सतीची खाण परिसरातील रस्त्याच्या बाजूला नाना लाड यांची दुचाकी उभी करून ठेवली असल्याचे दिसून आले. गाडीची चावी सुरूच ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. स्थानिक सरपंच व पोलीस पाटील यांनी एक दुचाकी संशयास्पदरित्या रस्त्यावर असल्याचे पोलीसांना सांगितले. पोलीसांनी गाडीच्या नंबरवरून शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी नाना लाड घरी आलेले नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली. यामुळे घटनास्थळी जात पोलीसांनी शोध घेतला असता सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात नाना लाड यांचा मृतदेह पिवळ्या नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. नाना लाड यांचा चुलत भाऊ गौरव लाड यांनी पोलीसांत अधिकृत माहिती दिली. यानंतर रात्री उशीरा पोलीसांनी आकस्मित मृत्यू नोंद करत मृतदेह विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला होता. शनिवारी सकाळी त्याचा भाऊ मुंबई येथून आल्यानंतर विच्छेदन करण्यात आले होते.
मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. मृतदेह घरी नेल्यानंतर लाड कुटुंबियांनी केलेला आक्रोश सर्वांचीच मने हेलावून टाकणारा होता. शनिवारी दुपारी कोळंब स्मशानभूमीत नाना लाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता. नाभिक समाज बांधवांच्यावतीने कोळंब स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. लाड यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे व पोलीस हेड कॉस्टेबल एस. एस. पवार हे करीत आहेत.



































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)

































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.