loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या ए. जी. हायस्कूल येथे आयोजित HPV लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा उत्साहात पार पडला

दापोली (चंद्रशेखर जोशी) : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उपजिल्हा रुग्णालय, दापोली यांच्या मार्फत आयोजित HPV लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा ए. जी. हायस्कूल, दापोली येथे उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. या मोहिमेसाठी समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमास दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, उपाध्यक्ष निकेत मेहता, संघटनेचे सदस्य सीए ऋषिकेश शेठ, अथर्व मेहता, सार्थक बुटाला व प्रा. कल्पेश तलाठी व इतर सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कांबळे, महाजन व दाभोळे यांनी सहकार्य केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील डॉ. शताक्षी कुलकर्णी, मळेकर सिस्टर, अस्मिता सिस्टर, जाधव सिस्टर व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या लसीकरण मोहिमेला मुलींचा चांगला प्रतिसाद लाभला. पुढील टप्प्यांसाठीही अशीच साथ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. आपल्या शाळेत अशी लसीकरण मोहीम राबवायची असल्यास दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

HPV म्हणजे Human Papillomavirus (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा एक प्रकारचा व्हायरस असून तो प्रामुख्याने त्वचा व शरीरातील काही भागांवर परिणाम करतो. हा व्हायरस विशेषतः महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमुख कारण मानला जातो. HPV लस ही या व्हायरसपासून संरक्षण देण्यासाठी दिली जाते. ही लस मुलींना लहान वयात दिल्यास भविष्यात गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे सरकार आणि आरोग्य विभागाकडून अशा लसीकरण मोहिमा राबवून जनजागृती केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg