loader
Breaking News
Breaking News
Foto

मोरगाव दलित वस्तीतील ठिय्या आंदोलन मागे

साटेली भेडशी (प्रतिनिधी) - मोरगाव दलित वस्तीत सौर पथदिवे दिवे बसविण्यास ग्रामपंचायत आणि ठेकेदार हलगर्जीपणा करत असल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या कडे लेखी निवेदन देऊनही या प्रकरणी जातीनिशी लक्ष न दिल्याने संतप्त ग्रामस्थानी सोमवारी मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना धारेवर धरले. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी याठीकाणी येवून आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दयावे. अशी आग्रही आणि आंदोलनात्मक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. अखेर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थानी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरपंच संतोष वसंत आईर, उप सरपंच देविदास महादेव पिरणकर, ग्रामसेवक यशवंत देविदास कुबल, सदस्य सत्यवान नाईक, संघमित्रा कदम, खुशी कदम उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg