मालवण (प्रतिनिधी) - युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधनाच्या प्रश्नामुळे जिल्ह्यात पेट्रोलपंपवर बाटलीत किंवा कॅनमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केल्यामुळे जलपर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मालवणात जलपर्यटन व्यवसायिकांना जलक्रीडेच्या नौकांमध्ये आवश्यक पेट्रोल भरण्यासाठी कॅनमधून पेट्रोल नेणे गरजेचे असताना त्यांना पेट्रोल पंपवर कॅनमध्ये पेट्रोल देण्यात येत नसल्याने मालवण दांडी येथील पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जलपर्यटन व्यवसायिकांना कॅनमध्ये पेट्रोल मिळत नसेल तर आम्ही व्यवसाय करायचा कसा ? असा सवाल अन्वय प्रभू यांनी उपस्थित केला आहे.
सध्या परीक्षांचा काळ संपत येऊन मालवण मधील पर्यटन हंगामास गती मिळत असतानाच पेट्रोल पंपवर कॅनमध्ये पेट्रोल मिळत नसल्याने पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पेट्रोल मिळत नसल्याने आज आमच्या नौका बंद ठेवण्याची वेळ येत असल्याने पर्यटकांचाही हिरमोड होत आहे, पेट्रोल नसल्यास आम्ही पर्यटकांना सेवा देणार कशी? ऐन पर्यटन हंगामात आमचा व्यवसाय चालणार कसा? असे सवालही अन्वय प्रभू यांनी उपस्थित करत जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयात जलक्रीडा व्यवसायिकांना सूट देण्यात यावी, अशी मागणी अन्वय प्रभू यांनी केली आहे.





























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















87.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.