loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात संगणक कक्षाचे जल्लोषात उ‌दघाटन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात मुंबई येथील 63 moons technologies Ltd या कंपनीचे पदाधिकारी प्रवीण सावंत, मा. शिरीन पाठारे, वैद्यनाथन कृष्णमुर्ती आणि संस्थेचे हितचिंतक सचिन चव्हाण यांच्या हस्ते संगणक कक्षाचे जल्लोषात उदघाटन करण्यात आले. यावेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, कोषाध्याक्ष सुजाता चव्हाण, व महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कंपनीचे प्रवीण सावंत व शिरीन पाठारे यांनी महावि‌द्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांनी कंपनीच्या सामाजिक दायीत्वाबाबत आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर संगणक कक्ष 63 moons technologies Ltd कंपनीच्या CSR फंडातील देणगीतून मिळालेल्या एकूण १० संगणकाच्या माध्यमातून प्रशस्त संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. महाविद्यालयातील या कक्षाच्या माध्यमातून महाविद्यालयातील तसेच गुहागर तालुक्यातील परिसरातील वि‌द्यार्थ्यांना अनेक प्रकारचे संगणक कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. याकरिता महावि‌द्यालयाने MKCL. सोबत तीन वर्षाचा करार केला असून नवीन शैक्षणिक धोरण २०२० साठी उपयोगी ठरणारे प्रमाणपत्र कोर्सेस अत्यंत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना MKCL या शासनमान्य संस्थेमार्फत संगणकाचे प्रशिक्षण मिळणार असल्यामुळे त्यांना भविष्यातील शिक्षणासाठी व नोकरी व्यवसायासाठी उपयोग होणार आहे. सध्या Certificate in Foundations of Artificial Intelligence (Al) & Machine Learning (ML) हा कोर्स सुरु असून एकूण ५५ विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व आजूबाजूच्या परिसरातील वि‌द्यार्थ्यांनी सदर संगणक कक्षात प्रवेश घेऊन त्याचा लाभ घ्यावा. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी आवाहन केले आहेत.

टाईम्स स्पेशल

सदर कार्यक्रमाला संगणक प्रशिक्षक मा. विकास कदम, प्रा. सुभाष घडशी उपस्थित होते. याशिवाय डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. जालिंदर जाधव, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, धनंजय गुरव, सुधीर टाणकर व महावि‌द्यालयातील विध्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लंकेश गजभिये यांनी केले तर उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg