संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॉक्सिचालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणी बाबत विशेष मार्गदर्शन व सभासद नोंदणी साठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली च्या सदस्यांनी सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अनेकठिकाणी कॅम्प घेऊन धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र् ऑटोरिक्षा आणि टॉक्सिचालक कल्याणकारी मंडळाबाबत मार्गदर्शन केले जात आहे व त्याच ठिकाणी सभासद नोंदणी करून घेतली जात आहे.
कडवई ग्रामपंचायत हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक अवधूत कुंभार व अक्षय पाटील यांनी उवस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले. व त्याच ठिकाणी उपस्थित रिक्षाव्यवसाईकांची मंडळाच्या सभासद नोंदणी करण्यात आली. यावेळी रिक्षसंघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सभासद होण्यासाठी असणारी तीन मुलांची अट शिथील करावी, अशी मागणी केली. यावेळी कडवई ग्रामपंचायत व रिक्षसंघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यलयाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कडवईचे प्रभारि सरपंच(प्रशासक) दत्ताराम ओकटे, ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी, ग्रामपंचायत कर्मचारी, मोटरवाहन विभागाचे चालक नरशिंह काळे, रिक्षा संघटनेचे खजिनदार रुपेश रहाटे, सदस्य राजेंद्र भोजने, प्रमोद शिंदे, बावा मयेकर, राजा येलोंडे, तुषार कदम व इतर सभासद उपस्थित होते.





























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















84.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.