दोडामार्ग (प्रतिनिधी) - नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दोडामार्ग बाजारपेठेतील कन्या विराजमान झाली आहे. अध्यक्षपदी विराजमान झालेल्या शिल्पा शशिकांत खोत या येथील पूर्वाश्रमीच्या शिल्पा शशिकांत प्रसादी असून संपूर्ण शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
येथील बाजारपेठेत फार पूर्वीपासून मनोहर प्रसादी यांचे कुटुंब वास्तव्यास होते. सध्या प्रसादी हे दोडामार्ग बाहेर वास्तव्यास आहेत. त्यांच्या एकूण चार मुलींपैकी शिल्पा मनोहर प्रसादी (विवाह नंतर चे नाव शिल्पा शशिकांत खोत) यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मधील कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या खोत यांच्या अध्यक्षपद निवडीचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले आणि एकच आनंद व्यक्त झाला. आपले संपूर्ण बालपण, सर्व शिक्षण दोडामार्ग शहरात केलेल्या शिल्पा यांच्या निवडीबद्दल शहरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले असून लवकरच त्यांचा एक भव्य नागरी सत्कार करण्याचे ठरविले जात आहे.









































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.