loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी कोष्टेवाडी येथे दि.३० मार्च ते ०२ एप्रिल या कालावधीत हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी चिपळूण तालुक्यातील निवळी कोष्टे वाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२६ या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन ३० मार्च २०२६ ते ०२ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री हनुमान सेवा मंडळ निवळी कोष्टे वाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला निवळी पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन श्री हनुमान मंदिर निवळी कोष्टे वाडी या मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक ३० मार्च २०२६ रोजी लहान मुलांचे फनी गेम्स खेळण्यात येणार असून बुधवार दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी ०७:०० वाजता स्थानिक मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार असून रात्री १०:०० वाजता लेखक, दिग्दर्शक संतोष पवार लिखित "हीच खरी फॅमिलीची गंमत आहे"या नाटकाचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या नाटकामध्ये लेखन, आणि गीते संतोष पवार यांनी लिहिले असून या नाटकाला नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे लाभले असून संगीत अशितोष वाघमारे यांचे असून प्रकाश योजना निखिल सातोपे आणि वेशभूषा हास्या पवार यांनी केली असून "हीच खरी फॅमिलीची गंमत आहे"या नाट्य प्रयोगातले नामांकित कलाकार कलाकार हर्षदा कर्वे, प्रतीक पाध्ये, मनीषा कुळकर्णी, राकेश शालिनी आणि शलाका पवार, रमेश वाणी, संतोष पवार हे अभिनेते आपला अभिनय सादर करणार आहेत.

टाईम्स स्पेशल

गुरुवार दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०६:३४ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ०८:३० वाजता ढोल-ताशे, टाळ-मृदुंग, चिपळी अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात दिंडी आणि भव्य दिव्य अशी श्री हनुमंताची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून दुपारी १२:३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ०७:०० वाजता हरिपाठ व श्री हनुमान सेवा मंडळ निवळी कोष्टीवाडी प्रसादीक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg