loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता सुरक्षा चॅम्पियन पुरस्काराने विलास पाटील सन्मानित

पनवेल - शैक्षणिक ज्ञानदानाच्या कार्यास सोबतच रस्ता सुरक्षेचे धडे ही विद्यार्थ्यांना देऊन त्यांना सहज नागरिक बनवण्यात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलातील सहाय्यक क्रीडा शिक्षक व आर एस पी महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी कमांडट विलास डी पाटील यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विष्णुदास भावे नाट्य गृह येथे सारथी सुरक्षा संस्था मार्फत रस्ता सुरक्षा अभियानात विशेष कामगिरी बजावणाऱ्या नामवंत व्यक्तींचा हिंदी चित्रपट सिनेमा अभिनेता शेहजात खान, आर टी ओ महाराष्ट्र राज्य प्रमुख अधिकारी भरत कळमकर नवी मुंबई चे आरटीओ पोलीस अधिकारी अग्निशमन दलाचे व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अनेक कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सुधागड हायस्कूल कळंबोलीचे क्रीडा शिक्षक व आर एस पी महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी कमांडट विलास डी पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. आर एस पी च्या कार्याची असलेली तळमळ पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणारा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात विविध उपक्रमातील सक्रिय सहभाग यासाठी विद्यार्थ्यांचे पहाटेचे 5 वाजता सराव प्रशिक्षण घेऊन दर्जेदार संचलन पथक निर्माण करून पोलीस पथकांच्या तोडीस तोड असे विद्यार्थी पथके निर्माण करून पोलीस विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाढती अपघात संख्या ह्यास आळा बसावा या उद्देशाने वाहतूक व रहदारीच्या नियमांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये यावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या द्वारे समाजात जनजागृती होईल उद्देशाने पोलीस विभागाच्या मार्गदर्शनान्वये महाराष्ट्र राज्य शासनाने शालेय अभ्यासक्रमात आर एस पी विषय सुरू केला. आर एस पी उपक्रम पी ए पाटील माजी समादेशक यांच्या नंतर नवी मुंबईमधून विलास डी पाटील सूरू करून त्यानंतर त्याची व्याप्ती रायगड जिल्हा ठाणे जिल्हा व मुंबई विभागात करून दर्जेदार युनिट तयार करण्यात आले. दरवर्षी सातारा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय आर एस पी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. पोलीस आयुक्तालय नवी मुंबईच्या तसेच प्रादेशिक परिवहन पनवेल व नवी मुंबई विभाग तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स बटालियन क्रमांक 2 तसेच नागरी संरक्षण विभाग उरण अग्निशमन विभाग यासर्वांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय कळंबोली येथे अनेकवेळा शिक्षकांचे प्रशिक्षण व अनेक वेळा विद्यार्थी शिबीर आयोजन करुन पोलीस आयुक्तालय नवी मुंबईत आर एस पी चा आगळा वेगळा ठसा उमटवला आहे.

टाईम्स स्पेशल

या विशेष कार्याची दखल घेत 2014 सालचे डीसीपी विजय पाटील यांनी पोलीस आयुक्तालय नवी मुंबई वाहतूक विभागामार्फत विशेष सन्मानित केले. सलग दहा वर्षे पोलीस आयुक्तालय नवी मुंबई मार्फत सन्मान करण्यात आला. विविध शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थी व शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करून विद्यार्थी व शिक्षकांना वाहतूक सुरक्षा व रहदारीच्या नियमांची माहिती व प्रशिक्षण तसेच आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, ट्राफिक पी टी, पदकवायत या विषयावर जास्तीत जास्त शाळांमध्ये प्रसाराचे कार्य प्रभावीपणे करुन अंमलबजावणी केली आहे. या कार्याबद्दल संस्थेचे सचिव विनय मोरे यांनी विलास डी पाटील नावाचे विनामाहीतीच्या आधारे फक्त कार्याची दखल म्हणून सुरक्षा रक्षक रस्ता सुरक्षा चॅम्पियन्स पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे, पर्यवेक्षक पुनम कांबळे, खेडकर, मगरे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व माध्यमाचे प्रमुख व आर एस पी चे सर्व पदाधिकारी, अधिकारी महिला पुरूष शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg