वेळणेश्वर : जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या ६५ वर्षीय इसमावर हल्ला करत त्याच्या गळयातील दोन तोळ्याची चैन चोरल्याची घटना गुहागर तालुक्यातील अंजनवेल सडयेवाडी येथे घडली आहे. यामध्ये ६५ वर्षीय इसम गंभिर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर २५ वर्षीय आरोपीने पलायन केले आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेलमधील फिर्यादी गणपत दाजी कदम, वय ६५, राहणार अंजनवेल सडयेवाडी यांनी दाखल केलेलेल्या फिर्यादीमध्ये आपल्याला रात्री जेवणानंतर घरासमोरील रस्त्याने बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत पायी चालत जावुन परत चालत येण्याची सवय होती.
त्याप्रमाणे २५ मार्च रोजी रात्रीचे जेवण झाल्यावर ९.४५ वाजता ते घरासमोरील रस्त्याने चालत असताना संशयीत आरोपी प्रतिक केरू डांगे, वय २५ याने त्यांच्याजवळ जाऊन आपण बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत जाऊन परत येवु असे सांगितले. यावर फिर्यादी यांनी आता रात्रीची १०.१५ वाजले असून मी परत घरी जातो असे बोलले. तरीही संशयीत आरोपी प्रतिक डांगे याने आग्रह करून फिर्यादी गणपत कदम यांना आपल्यासोबत बाबु कडव यांच्या हॉटेलपर्यंत चालत नेऊन तेथून परत येत असताना त्याने फिर्यादी यांच्या गळयात हात घालुन, गळा आवळून, गळयातील दोन तोळयाची चैन ओढली व खाली पाडुन दगड उचलुन फिर्यादी यांच्या डोक्यात व डाव्या डोळयावर मारून दुखापत केली. व फिर्यादी यांच्या टी-शर्टला पकडून ओढत घासपटत नेवुन सडयेवाडी येथे बाबु कडव यांच्या हॉटेलच्या बाजुच्या रस्त्याजवळील झाडीत टाकून देवुन मारहाण करून पळुन गेला.
यामध्ये फिर्यादी गणपत कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रत्नागिरी येथे झीरो नंबरने तक्रार दाखल करून गुहागर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रतिक डांगे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३९२, ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.