loader
Breaking News
Breaking News
Foto

सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेविरोधात सावंतवाडीकरांनी आता मोर्चा काढावा; संजू परब यांचा घणाघात

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील प्रलंबित प्रश्न आणि ५६ कोटींच्या नळपाणी योजनेतील त्रुटींकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रशासन ढिम्म असल्याने, आता सावंतवाडीकरांनीच आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढावा, असे आवाहन शिवसेना नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी नगरसेविका ॲड. निता कविटकर-सावंत उपस्थित होत्या. ​शहरात सुरू असलेल्या ५६ कोटींच्या नवीन नळपाणी योजनेबाबत बोलताना परब म्हणाले की, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सक्षम आणि तज्ज्ञ अधिकारी नसल्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आम्ही ही बाब नगरपरिषद बैठकीत व मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, गॅस पाइपलाइन योजनेसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, खडीकरणाचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​कारिवडे डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. "आम्ही कचरा प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती, परंतु परिस्थिती 'जैसे थे' आहे. सत्ताधाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही," अशी टीका परब यांनी केली. शहरातील गॅस पाईपलाईन टाकताना गळती होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्या लसीकरणाबाबत नगरपरिषदेच्या बैठकीत झालेला निर्णय तातडीने राबवावा, यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडीतील जनतेला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठीही आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे परब यांनी यावेळी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg