loader
Breaking News
Breaking News
Foto

शुक्रवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाका, वैभववाडीत मोठ्या प्रमाणात नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) - तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाका सह्याद्री पट्ट्यातील नावळे, सडूरे, शिराळे, करुळ, कुर्ली, अरुळे या गावांना बसल्या असून यामध्ये शिराळे गावात घराचे जास्त नुकसान झाले असून या मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी शिराळ गावातील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. या अजित लाडकोजी पाटील यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घरावरील कौले फुटली. तसेच हिरावती बाबाजी पाटील व मनोहर गंगाराम शेळके यांच्या घरावरील छप्पर कोसळून घरांचे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. जिल्हा परिषद स्वानिधीतून “गरिबांची घरे दुरुस्ती” या योजनेअंतर्गत घरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व सभापती सिद्धेश रावराणे यांच्या माध्यमातून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे लोके यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी तलाठी अक्षय लोणकर, सडुरे-शिराळ सरपंच दीपक चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत जाधव, पोलीस पाटील महेंद्र शेळके तसेच कोतवाल मोहन जंगम आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्यात आला. तसेच नावे गावातील बाबू शेळके, जनार्दन शेळके, मानाजी शेळके, विजय बावदाने, विद्या मंदिर नावळे बिरदेवाडी आधी घरांची कौले उडून नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg