loader
Breaking News
Breaking News
Foto

गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी ओसरेना

दापोली (प्रतिनिधी) - दापोलीत घरगुती सिलेंडरचा कमालीचा तुटवडा जाणवत असला तरी स्थानिक महसूल प्रशासन तुटवडा मान्य करत नाही ना पुरवठा एजन्सी तुटवडा मान्य करत. मग ग्राहकांना काही काम धंदा नाही म्हणून पुरवठादारांकडे गॅस सिलिंडरसाठी रांग लावून गर्दी करत आहेत का ? अशा प्रकारचा प्रश्न पुरवठादारांच्या समोर ग्राहकांची गर्दी होत असल्याने उपस्थित होत आहे. दापोलीत घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यवसायिक सिलेंडरची ग्राहकांनी मागणी करुनही तसेच ओटीपीचा एसएमएस पडून सुद्धा आठवडयाहुन अधिक दिवस गॅस सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी लागत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांच्या मनाची धाकधुक वाढत असल्याने अशा ग्राहकांसह अनेकजण हे सिलेंडर मिळण्यासाठी पुरवठादारांच्या कार्यालयासमोर गर्दी करत आहेत. अशाच प्रकारे दापोली येथील एका गॅस सिलिंडर पुरवठादाराच्या कार्यालयासमोर ग्राहकांनी गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरवठादारांच्या कार्यालयासमोरील तसेच आजुबाजुच्या दुकानादारांना तसेच रहीवाशांची संपर्क करून गर्दीबाबत विचारले असता सध्या नेहमीच गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकुणच गॅस सिलिंडर टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील संबंधित अधिकारी वर्गाने या गंभीर बाबीचा विचार करावा. ग्राहकांच्या उद्रेकाचा कडेलोट होणार नाही याची खबरदारी घेऊन सत्य ते सांगून टाकावे आणि गॅस सिलिंडर मग ते घरगुती स्वरूपाचे असोत नाहीतर व्यवसायिक अशाप्रकारचे असावेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी दापोलीत ग्राहकवर्गाकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg