रत्नागिरी : आखाती देशांमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात धुमसत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट तडाखा आता महाराष्ट्रातील, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते विकास कामांना बसू लागला आहे. डांबर निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आखाती देशांतून मुंबईत आयात केला जातो. मात्र, या युद्धामुळे समुद्री वाहतुकीवर मोठे निर्बंध आले असून, जहाजांच्या येण्या-जाण्यात अनियमितता वाढली आहे. कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम डांबराच्या दरांवर झाला असून, किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. काही काळापूर्वी ६३.५० रुपये प्रति किलो मिळणारे डांबर आता ८३.५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या काही दिवसांत किलोमागे २० रुपयांची झालेली ही दरवाढ बांधकाम क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
मुंबईतील चेंबूर आणि माहुल येथील केंद्रांमधून रत्नागिरी जिल्ह्याला डांबराचा पुरवठा केला जातो. जिल्ह्याचा विचार करता, वर्षभरात रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी सुमारे १० हजार टनांपेक्षा अधिक डांबराची आवश्यकता भासते. मात्र, वाढलेल्या दरांमुळे ठेकेदारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका अशा ठेकेदारांना बसणार आहे, ज्यांनी युद्धापूर्वीच जुन्या दरांच्या आधारे निविदा (टेंडर) भरून कामाच्या 'वर्क ऑर्डर' घेतल्या आहेत. सरकारी नियमांनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साहित्याचे दर वाढले, तरी अनेकदा जुन्याच दराने कामे पूर्ण करावी लागतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत, पण डांबराचे दर २० रुपयांनी वाढल्यामुळे ठेकेदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
जर शासनाने या वाढलेल्या दरांचा विचार करून सुधारित दरवाढ दिली नाही, तर ठेकेदारांना स्वतःच्या खिशातून पैसे भरून तोट्यात काम करावे लागेल. अशा परिस्थितीत, तोटा सहन करण्याऐवजी अनेक ठेकेदार कामे अर्धवट सोडण्याची किंवा रखडवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डांबराची ही टंचाई आणि दरवाढ अशीच कायम राहिली, तर ऐन हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते विकास कामांची गती मंदावेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे युद्ध दूर देशात सुरू असले, तरी त्याचे पडसाद मात्र कोकणातील दुर्गम भागातील रस्त्यांच्या कामांवर उमटताना दिसत आहेत.












































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.