loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल ( जितेंद्र गावडे ) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी प्लस उपक्रमात पनवेल महानगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातल्या एकूण २९ महानगरपालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. अनेक मोठ्या व अनुभवी महानगरपालिका स्पर्धेत असताना पनवेल महानगरपालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेल चे विशेष कौतुक होत आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीम ने अथक मेहनत करीत हा बहुमान पटकावला आहे. पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीही 100 दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता. 150 दिवसांच्या इ गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामधे महानगरपालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे; महानगरपालिकेचे Dashboard विकसित करणे; आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे; कार्यालयात e office चा प्रभावी वापर करणे; Whatsapp Chatbot चा वापर करणे; AI चा वापर करणे; GIS चा वापर करणे अश्या घटकांचा समावेश होता. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयात e office सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या Panvel Connect App द्वारे नागरिकांना सुलभ सेवा प्रदान करता आल्या. याचा मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धेसाठी झाला. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरीता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये संपूर्ण राज्यातून 29 महानगरपालिकांचा सहभाग होता. या सर्व महानगरपालिकांमधून एकच क्रमांक काढण्यात आला असून तो पनवेल महानगरपालिकेने पटकाविला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg