पनवेल - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे एकनाथ देशेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले रात्री १२.३० वाजता देशेकर यांचा चिंध्रण येथील घरी आले होते. गोगावले यांचे एवढे घनिष्ठ प्रेम एकनाथ देशेकर यांच्या प्रति असल्याचे पाहायला मिळाले. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत करुणेश्वर अनाथ आश्रम, कुष्ठरोग शांती आश्रम येथे वस्त्र आणि फळांचे वाटप करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रम राबविले. यावेळी ७० महिलांना विमा कवच देण्यात आले. महिलाना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्याचा संकल्प एकनाथ देशेकर यांनी सोडला असून लाभार्थीना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पत्नी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुस्तीचे आयोजनही करण्यात आले होते.
महिलाना विमा कवच, त्याच बरोबर बचत गट महिलाना आर्थिक मदत, आणि काही वस्तूंची मदत करण्यात आली. जेष्ठ नेते एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, पनवेल नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष आणि उद्योगपती जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य, महानगर पालिका नगरसेवक, पंचायत समितीचे उपसभापती भुपेंद्र पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी विविध पक्षाचे नेते यांनी देशेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. पनवेलचे कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि एकनाथ देशेकर यांची जनतेप्रती काम करण्याची असलेली आस्था पाहून शेकापचा शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)

































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.