loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त दोडामार्गात 'गुणवंत गौरव' सोहळ्याचे आयोजन

तिलारी (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून 'समाज जागृती मंच, दोडामार्ग' या संस्थेच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या संस्थेच्या कार्यकारीणी बैठकीत या सन्मानपात्र व्यक्तींच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. हा भव्य सन्मान सोहळा शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता 'न्यू इंग्लिश स्कूल, दोडामार्ग' येथे संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक बुधाजी जाधव, सचिव संतोष सगुण कदम, खजिनदार महेश मोहन जाधव, उपाध्यक्ष गोविंद केशव कदम, सहसचिव शंकर शांताराम जाधव उपस्थित होते. तसेच सदस्य भगवान महादेव जाधव, मंगेश प्रकाश जाधव, उषाकिरण क्रांतीराज सम्राट, जेनिफर मार्शल लोबो, कैतान अंतोन डिसोजा, विजय गुणाजी कांबळे आदी उपस्थित होते. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून गुणवंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

समाजाच्या विविध स्तरांत आपल्या कतृत्वाने ठसा उमटवणाऱ्या खालील व्यक्ती व संस्थांना यंदा सन्मानित केले जाणार आहे: विधी क्षेत्र: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेले ॲड. समीर शंकर जाधव आणि ॲड. महेंद्र मोहन जाधव. पत्रकारिता: समाजमनाचा आरसा मांडणारे अभ्यासू पत्रकार तेजस देसाई आणि नवोदित पत्रकार प्रथमेश प्रदीप नाईक. शिक्षण: दहावी (इंग्रजी माध्यम) परीक्षेत ९३% गुण मिळवून यश संपादन केलेली कु. कॅलीस मार्शल लोबो आणि शैक्षणिक क्षेत्रातील अजिंक्य अशोक कदम. प्रशासन व शौर्य: आदर्श कामगिरीबद्दल ग्रामसेवक जनार्दन खानोलकर आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आपल्या मातेला वाघाच्या जबड्यातून सोडवणारे धाडसी परशुराम लक्ष्मण जाधव. समाजसेवा: वयाच्या ८० व्या वर्षीही तितक्याच उर्जेने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाच वृद्धाश्रम चालवणारे फादर जॉन. महिला सक्षमीकरण: सामूहिक शेती आणि कुक्कुटपालनातून आदर्श निर्माण करणारा 'उत्कर्ष कृषी पर्यटन महिला समूह' (सासोली) आणि 'रमाई बचत महिला समूह' (मणेरी).

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg