खेड : तालुक्यातील भोस्ते घाट येथे रविवारी रात्रीच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकर उलटून होऊन मोठा अपघात घडला. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमधून इथाइल ऍसिटेट हे ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर अचानक पलटी झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र वास जाणवू लागला. काहींनी श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारीही केल्या. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच संबंधित कंपनीची सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लिकेज नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच संबंधित कंपनीची सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लिकेज नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, संबंधित कंपनीवर PFAS उत्पादन संदर्भातील वाद सुरू असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा टँकर मुंबईकडे निर्यातीसाठी जात असताना अपघात झाला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघात असूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

























































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.