केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी येथे राज्य नाट्य स्पर्धेत आपला ठसा उंटविणार्या ईठ्ठला या दोन अंकी नाटकातील रंगकर्मींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमात अमोल रंगयात्री लांजा निर्मित ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या संपूर्ण टीमचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राज्य नाट्य स्पर्धेच्या ६४ व्या वर्षानिमित्त रत्नागिरी येथे झालेल्या प्राथमिक फेरीत ‘ईठ्ठला’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल नाटकाचे निर्माता, कलाकार, संगीतकार, प्रकाश योजना तज्ज्ञ, नेपथ्यकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार तसेच बॅकस्टेज कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशामुळे स्थानिक रंगकर्मींच्या कलेला नवे व्यासपीठ मिळाले असून रंगभूमीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यास अमोल रंगयात्री संस्थेचे दयानंद चव्हाण, विजय शिंदे, शरद चव्हाण, अर्चना पांचाळ, प्रदीप कशेळकर यांच्यासह नाट्य परिषदेचे समीर इंदुलकर, अमेय धोपटकर, श्रीकांत भाटवडेकर, वामन कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नाटकाच्या यशाबद्दल कलाकारांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘ईठ्ठला’ या नाटकाने आपल्या प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि तांत्रिक बाजूंच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ग्रामीण आणि सामाजिक आशय मांडणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यशस्वी प्रयोगांनंतर आता या नाटकाचे पुढील प्रयोग मुंबई, ठाणे, पनवेल आणि लांजा येथे आयोजित करण्यात येणार आहेत. नाट्यप्रेमींनी या उत्कृष्ट नाट्यकृतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल रंगयात्री लांजा संस्थेतर्फे अमोल रेडीज आणि जयू पाखरे यांनी केले आहे. या सन्मान सोहळ्यामुळे स्थानिक रंगभूमीला चालना मिळून नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.