loader
Breaking News
Breaking News
Foto

परराज्यातील कामगाराचा सोनाळी नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ

वैभववाडी (प्रतिनिधी) - परराज्यातील कामगाराचा सोनवणे सुख नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राकेश केतन मांझी वय वर्ष 25 राहणार गोपाळगंज बिहार असे कामगाराचे नाव असून तो गेली दोन दिवसापासून बेपत्ता होता. नापणे येथे सुरू असलेल्या नव्या पुलाच्या कामासाठी बिहार मधून आलेल्या कामगारांमध्ये राकेश मांझी त्याचा समावेश होता. मांझी तीन महिन्यापासून येथे काम करत होता. बुधवारी वैभवाडी शहरातील आठवडा बाजार साठी तो गेला होता मात्र रात्री उशिरापर्यंत नापणे येथे वास्तव्यास परतला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सहकारी कामगारांनी त्याचा शोध सुरू केला. परंतु तो सापडला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान शुक्रवारी सकाळी सोनाळी नदी पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळण्याची माहिती येथील पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांनी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सहकारी कामगारांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह राकेश मांझी चा असल्याची पटवली. मिळालेल्या माहितीनुसार राकेशला दारूचे व्यसन होते. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg