loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुका समितीच्या वतीने महिला युवती आणि बालिकांकरता विशेष वनभोजनाचे आयोजन

दापोली (चंद्रशेखर जोशी) : निसर्गाची ओळख व्हावी आणि जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने दापोली तालुका समितीच्या वतीने महिला युवती आणि बालिकांकरता विशेष वनभोजनाचे आयोजन जालगाव येथील मुकुल बर्वे यांच्या आमराई मध्ये करण्यात आले होते. वनभोजना दरम्यान कोणत्याही सिंगल युज प्लास्टिक किंवा युज अँड थ्रो वस्तूंचा वापर प्रकर्षाने टाळण्यात येऊन जेवण आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकरता स्टीलची ताट वाटी आणि पेल्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती समितीच्या कार्यवाह योगिनी देवधर यांनी दिली. या वनभोजनासाठी सुमारे सव्वाशे तरुणी, बालिका आणि महिला उपस्थित होत्या. या वनभोजनाचे दरम्यान कुटुंब प्रबोधनाबद्दल माहिती विजयश्री एकबोटे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाश्वत पर्यावरण विकासाच्या संकल्पनेला कृतीत्मक आकार देताना कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर कोणताही कचरा होता कामा नये. या विषयाची जाणीव जागृती ही शाश्वत वस्तूंचा वापर करून बालिकांपासून महिलांना करून देण्यात आली. संपूर्ण दिवसभर स्वयंप्रेरणेने कामकाज करण्यात आलं. प्रत्येक सहभागीना आपापली जबाबदारी वाटून देण्यात आली होती. ती स्वतःहून प्रत्येकाने यशस्वीपणे पार पाडली. स्वयंशिस्त आणि पर्यावरण संवर्धन या दोन गोष्टींची जाणीव जागृती करण्याकरता या पर्यावरण पूरक वनभोजनाचे आयोजन करण्यात आल्याचं संयोजक दापोली तालुका कार्यवाह योगिनी देवधर यांनी माहिती देताना सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg