loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) - बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सवासाठी श्री हनुमान मंदिर तसेच उभाबाजार परिसर मंडप, तोरणे, आकर्षक रोषणाई तसेच रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्सवाच्या पुर्वसंध्येला बुधवारी रात्री स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ झाला. त्यानंतर चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा "भीषण शौरी' हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर झाला. या नाट्यप्रयोगाच्या आरंभी होणारा बाल मारुती चा प्रवेश रूद्र मधुसूदन धामापुरकर याने केला. गुरूवारी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी श्री हनुमान जन्म सोहळ्याचे कीर्तन ह.भ.प. प्रसाद आंबिये यांनी केले. जन्म सोहळा होऊन वाजतगाजत पारंपारिक श्री हनुमान फेरीला आरंभ झाला. यावर्षी श्री हनुमान होण्याचा बहुमान प्रांजन प्रविण नाटेकर यास मिळाला. भक्त भाविकांना सोट्याचा प्रसाद देऊन ही फेरी मंदिरात परत आली.

टाईम्स स्पेशल

सायंकाळी रामनाम जप तसेच श्री विठ्ठल सोहिरा महिला भजनसेवा मंडळ, बांदा यांची भजनसेवा झाली. रात्री रत्नागिरी येथील प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. श्री हनुमान सेवक मंडळ, बांदा आणि सिद्धेश विनोद शिरोडकर, बांदा यांच्यावतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg