पनवेल (प्रतिनिधी) - रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील उपक्रमशील विद्यालय अशी ओळख असणाऱ्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये 'एक मुलाखत - यशस्वी माजी विद्यार्थ्याची' या नाविन्यपूर्ण नवोक्रमात विद्यालयाचे प्रेरणास्थान रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची अत्यंत माहितीपूर्ण व खुमासदार दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान सुरुवातीलाच लोकनेते रामशेठ ठाकूर हे अत्यंत हळवे आणि भावूक झाल्याचे दिसले. मुलाखतीच्या प्रारंभी 'या विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून ह्या क्षणाला आपल्या नेमक्या भावना काय आहेत ?' ह्या बाल मुलाखतकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर हळवे व भावूक होत म्हणाले," माझे अनेक ठिकाणी हजारो लाखो सत्कार झाले परंतु मी ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या विद्यालयात माझ्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने ही मुलाखत संपन्न होतेय, माझा सत्कार होतोय याच्यासारखा आनंद नाही, याची बरोबरी दुसऱ्या कुठलाही सत्काराला किंवा मुलाखतीला येणार नाही असे भावनिक उद्गार काढून प्रचंड हळवे झाले. ह्या नाविन्यपूर्ण उपक्रम मालिकेच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण विद्यालयाच्या प्रांगणात रामनवमीच्या दिनी दि.२६ मार्च २०२६ रोजी पूर्ण करण्यात आले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, राजकीय व उद्योग क्षेत्रातील दानशूर बहुआयामी व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मुलाखतीने या विशेष उपक्रमाच्या मालिकेचे तिसरे पुष्प गुंफले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'रामपर्व' ह्या सांस्कृतिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत संपन्न झाली. यावेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जे.एम.म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, जुनिअर कॉलेज विभागाचे स्थानिक शाळा समितीचे सदस्य व जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख, वहाळ साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर,विश्वनाथ कोळी, ॲड.राहुल घरत व विजय घरत, भार्गव ठाकूर, वसंतशेठ पाटील, एम.डी.खारकर, बी.टी.कांबळे गुरूजी, रत्नप्रभा घरत, रघुनाथ देशमुख, राम मोकल, योगिता भगत, मिनाक्षी पाटील, सुहास भगत, हेमंत ठाकूर, किशोर पाटील, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, साईचरण म्हात्रे, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, वैभव घरत, उत्तम कोळी, कामिनी कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या ज्योत्स्ना ठाकूर, उपमुख्याध्यापक विलासराव लेंभे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, लाईफ वर्कर देवेंद्र म्हात्रे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्या सायली वडवळकर, पर्यवेक्षिका प्रणिता गोळे आदी मान्यवर, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक सागर रंधवे यांचे संहिता लेखन व दिग्दर्शन तसेच मल्हार टीव्हीचे विशेष तंत्रसहाय्य, उपशिक्षक विशांत ठाकूर यांचे विशेष सहाय्य व कलाशिक्षक गणेश भोईर यांनी साकारलेली समर्पक व आकर्षक वटवृक्षाच्या पारावरील माजी विद्यार्थ्यांची प्रतिकृती यामुळे हे चित्रिकरण प्रभावी झाले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व उद्योगक्षेत्रातील प्रेरणा कोणाकडून मिळाली, कामाच्या व्यग्रतेतून कुटुंबासाठी कसा वेळ देता, प्रशासकीय अनुभव, समाजोपयोगी कामे, तरूणांना संदेश, बालपणीच्या आठवणी, शालेय जीवनातील अनुभवावर आधारीत वैविध्यपूर्ण व कुतूहलपूर्ण प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. मुलाखतकाराच्या भूमिकेत वावरताना विलक्षण उत्साह, नाविन्यपूर्ण उपक्रमाची अनुभूती व आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरूंन ओसंडत होता. अत्यंत आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी ह्या भागाचे चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर खरंतर हे हिमालयाइतके उत्तुंग व्यक्तिमत्व परंतु मुलाखतकाराच्या भूमिकेत वावरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना अत्यंत समर्पक, हसत खेळत, मनमोकळेपणाने आणि मिश्किलपणे तर आंदोलनाची आक्रमकता दाखवतानाचा कणखर बाणा, संसदेमधील अनुभव कथन करताना मंत्रीपदाच्या प्रलोभनांना बळी न पडता दर्शविलेला प्रामाणिकपणा तर कधी हळवेपणाने भावूक होत आपल्या स्वभावातील मृदूता व तरल स्वभावाचे प्रदर्शन करीत सहजपणे उत्तरे दिली. मुलाखतकार विद्यार्थ्यांमध्ये आरोही नाळे, स्मित मोकल, कपिल सोनकांबळे, अभिलाषा म्हात्रे, आदिती पाटील, सात्विक भोईर, सिद्धांती सुतार व प्रज्वल कोरेकर यांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण मुलाखत घेतली.









































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.