लांजा (वार्ताहर) - मोटरसायकलची टँकरला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू होण्याची घटना सोमवारी ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाटुळ - दाभोळे मार्गावरील विलवडे रेल्वेस्टेशन नजीक घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद बागवान हा सोमवारी ३० मार्च रोजी दुपारी आपल्या ताब्यातील टँकर (क्र. एमएच ४६ सीएल ७५३६) घेवून वाटुळ - दाभोळे मार्गे आंबा घाट ते कोल्हापूर असा चालला होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा टँकर लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन नजीक २०० मीटर अंतरावर आला असता स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (क्र. एमएच १० सीडी ९६०२) ही मोटरसायकल घेवून तेजस नरेंद्र देशपांडे (रा. दुर्वांकुर अपार्टमेंट, हुपरी व्हीटीसी मिरज, जि. सांगली) याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आणि मोटरसायकल वेगाने चालवून टँकरला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तेजस देशपांडे याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद चाँद अल्लाउद्दीन बागवान (२३ वर्षे, रा. करदाळ ता. अक्कलकोट जि. सोलापूर) याप्रकरणी पोलिसांनी मोटरसायकल स्वार तेजस देशपांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. दिनेश आखाडे हे करत आहेत.






























.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.