loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे आणि इतर अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षा कायद्याबाबत जाणीव जागृती आणि खाद्यपदार्थ उत्पादन व निर्मितीमध्ये पाळावयाचे नियम, घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करत शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेस मालवण तालुक्यासह जिल्हाभरातील सुमारे ८५० अन्नसुरक्षा परवानाधारक व कर्मचारी यांनी उपस्थित राहून लाभ घेतला. या कार्यशाळेत प्रारंभी जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी प्रास्ताविक करत अन्नसुरक्षा प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित मार्गदर्शक अधिकारी करण गावित, अभय चंदनशिवे आणि प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांचे मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर व मालवण शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रशिक्षक अंकुश जोगदंडे यांनी अन्नसुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. खाद्य व अन्न यांचे उत्पादन तसेच त्यांची विक्री, साठवणूक आणि वितरण करण्याच्या व्यवसायात असणाऱ्यांना केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा नियमावलीनुसार अन्नसुरक्षा परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्न व खाद्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यक्तींनी प्रथम स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. तसेच खाद्यपदार्थ उत्पादन ज्या जागेत केले जाते ती जागा सुरक्षित, बंदिस्त व स्वच्छ ठेवावी. तसेच खाद्यपदार्थ पॅकिंग व वितरणाची जागा देखील सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ उत्पादनामध्ये काम करणाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात धुतले पाहिजे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे प्रमाणित असावे. त्याचप्रमाणे शासनाच्या अन्नसुरक्षा कायदा बाबत प्रत्येकामध्ये जाणीव जागृती असणे महत्त्वाचे असून कायद्यातील तरतुदींचे व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नियमांचा भंग केल्यास दंड व इतर कारवाई होऊ शकते, असे मार्गदर्शन यावेळी अधिकाऱ्यांनी करत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले तसेच इतर कोणाच्या शंका असतील तर थेट अन्नसुरक्षा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकारी करण गावित आणि अभय चंदनशिवे यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg