loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात भर रस्त्यावर दोन राऊंड गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलीस आयुक्तालयातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून जाणाऱ्या तक्रारदार इंजमाम अमीरुददीन सिध्दीकी(२६) याला अडवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून पोबारा करणाऱ्या वागळे पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या सराईत आरोपी अबीउल्ला शफीकुटरहमान खान(३९) याला वागळे पोलिसांच्या पथकाने २९ मार्च,२०२६ रविवारी देशी बनावटीचे अग्निशस्त्रासह अटक करून त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सादर गोळीबाराची घटना २७ मार्च, २०२६ रोजी मध्य रात्रीनंतर घडली होती. आरोपी खान याच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील फरारी आरोपी अबिउल्ला खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार २७ मार्च, २०२६ रोजी मध्य पाऊणे एकच्या सुमारास नाशिक मुंबई हायवे, धर्मवीर कट, नौपाडा जि. ठाणे येथील शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरीता आलेले तक्रारदार इंजमाम अमीरूददीन सिध्दीकी वय २६ हे त्यांची गाडी अॅक्टीव्हा क्रं. MH 04 MB 1065 यात पेट्रोल टाकण्यासाठी आले असता यातील आरोपी नामे जबीउल्ला शफीकुररहमान खान याने मागील दोन महिन्यापुर्वी " तेरा बाप कैसे मरा, ट्रेन से कटकर मराना, कुत्ते के मौत" असे तक्रारदार यांचे वडीलांबददल अपशब्द वापरल्याचे कारणावरून त्यांच्यात वारवार भांडण होत असल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उददेशाने कोणत्यातरी बनावटीचे अग्निशस्त्राने त्यांच्यावर दोन राउंड फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची मैत्रीण नामे इंजल एलबीस फर्नांडीस हीस बंदुकीचा धाक दाखवून तक्रारदार यांची गाडी जबरीने घेवून गेलेबाबत तक्रारदार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९ (१), ३०९ (४),३५१ (३), ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महा. पो. कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

फरारी आरोपी अबीउल्ला शफीकुटरहमान खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चार गुन्हे तर श्रीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. वागळे इस्टेट परिसरातील समता नगर येथून पोलिसांनी अटक केली. सदर गुन्हयाचा तपास नौपाडा पोलीस ठाण्याचे सपोनि भांगे करीत असुन अटक आरोपीला न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्याला २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg