loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण गावासाठी सोलर लॅम्प व बॅटरी उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करणार - विजय गवस

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ भागातील तेरवण गाव सह्याद्री पट्ट्‌यामध्ये येत असल्याने येथे हत्ती, वाघ, गवेरेडे, अस्वल यांचा मुक्त संचार असल्यामुळे ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण होत आहे. तरी कृपया आपण तेरवण गावासाठी १२ सोलर लॅम्प व बॅटऱ्या द्यावेत, अन्यथा वन विभाग यांच्या विरोधात ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील. असा इशारा विजय गवस यांनी ग्रामस्थ यांच्या वतीने दिला आहे. तसे निवेदन वन विभाग याना दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील शेवटचे गाव चंदगड तालुक्यातील हद्दीत आहे, या ठिकाणी मोठया प्रमाणात वन्यप्राणी वावर आहे. या ठिकाणी वन विभाग यांनी उजेडासाठी सोलर लॅम्प, बॅटरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. पण आजपर्यंत वन विभाग कडून दखल घेतली नाही. असे विजय गवस यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत गावात एकही सोलर लॅम्प बॅटरी दिली गेली नाही, असे म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

लवकरात लवकर आपण या सुविधा देवून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असे विजय गवस, विजय खेमाजी गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, अजय नाईक, सचिन गवस, उमेश गवस, पांडुरंग सखाराम गवस, विश्वनाथ गवस, पांडुरंग रामा गवस, ऋतुजा सावंत, मोहन सावंत, मंगल शांताराम गवस, मंगल शंकर गवस, शांती गवस यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg