loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ला, रत्नागिरी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी - श्री हनुमान सेवा मंडळ, किल्ला, रत्नागिरी यांच्यावतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून तिर्थप्रसादाची वेळ सायंकाळी ०४ ते रात्री ११.०० वाजेपर्यंत राहणार आहे. आज सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली असून दुपारी ०१ ते ०३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०६ ते ०८ वाजेपर्यंत सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर रात्री ठिक १०.०० वाजता श्री जुगाई देवी नमन मंडळ, नरबे (घाणेकरवाडी) यांच्यातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे. या नमनामध्ये ‘कामासुराचा वध’ हा गण, ‘साजशृंगाराने सजलेली नटखट गौळण’ तसेच खास आकर्षण म्हणून राम-रावण नृत्य व युद्ध सादर केले जाणार आहे. हा सर्व कार्यक्रम श्री हनुमान मंदिर, किल्ला, रत्नागिरी येथे पार पडणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg