loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी येथील दूरध्वनी केंद्र येथे चोरी करणारा चोरटा अटकेत

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या आठवडयात साटेली भेडशी येथील दूरध्वनी केंद्र ठिकाणी मोबाईल सी डाॅट कार्ड तसेच स्क्रॅप साहित्य असा जवळपास चाळीस हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले होते, यामुळे खळबळ उडाली होती. दूरध्वनी केंद्र अधिकारी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या नंतर तपासाला सुरूवात झाली. सोमवारी रात्री पुन्हा दूरध्वनी केंद्र येथे कुलुप तोडून चोरी करून तो माल मोटार सायकल वरून घेऊन जात असताना साटेली भेडशी विजघर मार्गावर पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. यावेळी पहिल्या चोरी बाबत काही हालचाल नाही. ती पचली म्हणून रात्री पुन्हा चोरी केली ही कबुली दिली आहे. पहिल्या चोरी दरम्यान आणखी काही साथीदार होते अशी माहिती समोर आली. या प्रकरणी शंकर तायाप्पा घोरपडे वय वर्षे ३१ रा. लासुरणे इंदापूर पुणे याला ताब्यात घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी येथील दूरध्वनी केंद्र येथे मागच्या महिन्यात चोरी करून चाळीस हजार रुपये मुद्देमाल चोरून नेला होता. याची फिर्याद दिली होती. असे असताना पुन्हा दूरध्वनी केंद्र येथे कुलुप तोडून दरवाजा उघडून पुन्हा दहा हजार रुपये साहित्य चोरी केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg