loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात संत सोहिरोबानाथ निर्वाणदिन भक्तीभावाने साजरा

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम नवमीला नाथांचा निर्वाण दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरुप्रतिपदेपासून श्रीराम नवमीपर्यंत चाललेल्या नाथ सेवा उत्सवाची या दिवशी सांगता झाली. सकाळी नाथांच्या पादुकांवर अभिषेक व पूजाअर्चा होऊन दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ झाला. यावेळी संत सोहिरोबानाथ चरित्राचे वाचन करण्यात आले. सकाळी दहा वाजता श्रीराम नाम जप आरंभ झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इन्सुली डोबाशेळ येथील आत्मसाक्षात्कार मंदिर येथून शेकडो नाथभक्त पालये गोवा येथे नाथांच्या जन्मस्थानी जाताना, त्यांनी बांदा येथे थांबून नाथांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दुपारी ठीक बारा वाजता या मठात श्रीराम जन्माचा सोहळा झाला. बांदा विठ्ठल मंदिर व श्री बांदेश्वर मंदिर येथील श्रीरामाच्या पालख्या प्रतिवर्षाप्रमाणे नाथांच्या भेटीस येऊन गेल्या. दुपारी एक वाजता आरती झाली. सायंकाळी महिलांची भजन सेवा व त्यानंतर सायंआरती झाली. रात्री नित्य भजनकर्मींची भजन सेवा, आरती व त्यानंतर गाऱ्हाणे होऊन प्रतिवार्षिक नाथ सेवा उत्सवाची सांगता झाली. या सोहळ्या निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg