loader
Breaking News
Breaking News
Foto

वादळी पावसामुळे लांज्यातील विलवडे आणि खावडी गावांना फटका; घर आणि गोठ्याचे नुकसान

लांजा (संजय साळवी) - गुरुवारी २६ मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका तालुक्यातील विलवडे आणि खावडी येथील ग्रामस्थांना बसला असून घरे आणि गोठा यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह संपूर्ण तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला होता. यावेळी गारांची देखील बरसात झाली होती. या पावसामुळे तालुक्यातील विलवडे वाणीवाडी येथे आंब्याचे झाड घरावर पडून येथील रिया खेतल यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील खावडी येथे वादळी वाऱ्यामुळे गोठा कोसळून एका गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg