रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आपली प्रगतीची घोडदौड कायम राखली असून, संस्थेला यावर्षी ७२ लाख २३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतिश शेवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे श्रम यामुळेच हे यश संपादन करता आले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना शेवडे म्हणाले की, सरत्या आर्थिक वर्षात संस्थेकडे एकूण ४७ कोटी ०४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, तर ४० कोटी २३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेचे भागभांडवल ७७ लाख ३५ हजार रुपये असून, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे संस्था नवनवीन टप्पे गाठत आहे.
विशेष म्हणजे, यंदा संस्थेच्या वसुलीचे प्रमाण अत्यंत प्रभावी राहिले असून तब्बल ९८% वसुली करण्यात संस्थेला यश आले आहे. थकबाकीचे प्रमाण अत्यल्प असले तरी, उर्वरित थकबाकीदारांवर 'कलम १०१' अन्वये कायदेशीर कारवाई करून १००% वसुली करण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे. भविष्यातील योजनांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पावस येथील शाखेचे लवकरच नवीन स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात येईल. पावस मुख्य बाजारपेठेत सर्व सोयीसुविधांनी युक्त असे सुसज्ज कार्यालय सभासदांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. केवळ आर्थिक उलाढाल न करता सामाजिक बांधिलकी जपण्यावरही संस्थेचा भर आहे. त्यानुसार, मिळालेल्या नफ्याचा काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी विनियोग करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
सभासदांच्या गरजांचा विचार करून आगामी काळात 'गृहकर्ज' योजना सुरू करण्याबाबत संस्थेकडून सकारात्मक विचार केला जात आहे. अनेक सभासदांनी गृहकर्जाची मागणी केली असून, तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही सेवा लवकरच कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे. सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी जो विश्वास दाखविला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून भविष्यात अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष सतिश शेवडे यांनी यावेळी दिली.


1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.